पुणे : जंगली महाराज रस्ता परिसरातील रेव्हेन्यू काॅलनीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाखांचे दागिने चोरल्याची घटना घडली.
याप्रकरणी एका तरुणाने शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि कुटुंबीय रेव्हेन्यू काॅलनीतील एका सोसायटीत राहतात. सोमवारी ते त्यांच्या शिरूर तालुक्यातील मूळ गावी गेले हाेते.
तेव्हा चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दोन सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. सायंकाळी ते गावाहून परतल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. पाेलीस उपनिरीक्षक अजित बडे तपास करत आहेत.