पुण्यात लसीकरणाच्या पाचव्या टप्प्याची तयारीच नाही

पुणे – लसीकरण्याच्या पाचवा टप्पा जो दि. 1 मे पासून सुरू होणार आहे, याची कोणतीच तयारी महापालिका करू शकली नाही. या संदर्भातील कोणतेही पत्र, गाइडलाइन्स महापालिकेला मिळाले नसल्याने त्यांना तयारी करता आली नाही.

आगामी टप्प्यात बऱ्याच मोठ्या संख्येचे लसीकरण होणार आहे. त्यामुळे त्याची तयारी महापालिकेला करावी लागणार आहे. परंतु लस वितरणासंदर्भात राज्य सरकारकडून काहीच गाइडलाइन्स अद्याप महापालिकांना आल्या नाहीत. त्यामध्ये खासगी लसीकरण केंद्रांना द्यायचे की नाही, लस मोफत द्यायची का वगैरे सगळ्य गोष्टींविषयीची कोणतीही पारदर्शकता अद्याप महापालिकांपर्यंत पोहोचली नाही.

आम्ही राज्य सरकारच्या लसीकरण विभागाला विचारले असता, त्यांच्याकडेही अद्याप कोणतेच गाइडलाइन्स आल्या नसल्याचे सांगण्यात आल्याचे, महापालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले. तसेच त्यांच्याकडून लेखी आदेश आले तर आम्ही नियोजन करून आमची कार्यवाही लगेचच सुरू करू, असे डॉ. भारती म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.