पुणे – गोरगरिबांचे अश्रू पुसणे, शिक्षणापासून वंचित मुलांना मदतीचा हात देऊन त्यांना शाळेची दारे खुले करून देणे गुन्हा आहे का? असा संतप्त प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी उपस्थित केला.
करोनानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका मायमाउलीची मुलांविषयीची व्यथा ऐकल्यावर मी प्रचाराच्या धावपळीतून वेळ काढत संबंधित कुटुंबातील दोन्ही मुलांच्या शाळेची फी भरली. त्यानंतर त्या दोन्ही मुलांच्या शाळेची दारे पुन्हा खुली झाली. मात्र, त्यावर आक्षेप घेत निवडणूक विभागाने मला कारणे दाखवा नोटीस पाठवली.
निवडणुका येतात- जातात. मात्र, संबंधित महिलेच्या चेहऱ्यावरील दु:ख बघवले नाही आणि तात्काळ मुलांनी फी भरली. फी भरून काही चूक केली असेल, तर असे असंख्य गुन्हे अंगावर घेण्याची माझी तयारी आहे. माझे गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठीचे काम सुरूच राहणार आहे, असे भोकरे यांनी स्पष्ट केले.