पुणेः शहरातील स्वारगेट परिसरातील महर्षीनगर भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून पकडले. स्वारगेट पोलिसांच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने महर्षीनगर भागात सापळा सचला आणि एका बंगलादेशी व्यक्तीला पकडले. याबाबत पोलीस हवालदार सोमनाथ ढगे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी पकडलेल्या बांगलादेशी व्यक्तीचे नाव एहसान हाफिज शेख (वय ३४ सधा राहणार महर्षीनगर, गुलटेकडी, मूळ राहणार बांगलादेशी) याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध परकीय कलम १४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी बनावट आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड कारवाईत जप्त केले आहे. पोलिसांकडून या व्यक्तीने ही बनावटे कागदपत्रे कशी मिळवली याचा तपास करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये त्याने भारतात घुसखोरी केली होती. त्यांतर तो पुण्यात वास्तव्याला आहे. त्याने कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. स्वारगेट पोलिसांच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी स्वारगेट परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. याचा पुढील तपास वरिष्ठ पाेलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील हे करत आहेत.