पुणे: सर्वात मोठ्या स्क्रीनवर रंगणार भारत-पाक सामना

नगरसेवक अमोल बालवडकर यांचा उपक्रम

पुणे  – टी 20 विश्‍व करंडक क्रीकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी बालेवाडीतील दसरा चौकात संजय फार्म येथे शहरातील सर्वात मोठी एलईडी स्क्रीन उभारली जाणार आहे. 18 बाय 24 फूट ही स्क्रीन असणार असून बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांसाठी ही सोय करण्यात आली आहे.

माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी क्रिकेट रसिकांसाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या शिवाय, या ठिकाणी क्रीकेट रसिकांना लाईव्ह डीजे, फेस पेटींग तसेच चहा आणि नाष्ट्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बालवडकर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.