Chess for Freedom Conference2024 – भारतातील अग्रगण्य ऊर्जा उत्पादक कंपनी इंडीयन ऑईल यांनी प्रायोजित केलेल्या व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना(फिडे)यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस फॉर फ्रीडम परिषदेचे आयोजन येत्या १९ ते २१ जुन दरम्यान पुणे येथे करण्यात आले आहे.
फिडेच्या वतीने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांनी या परिषदेचे आयोजन केले असून विविध ठिकाणी तुरुंगात असलेल्या जगभरातील बंदीवानांच्या पुनर्वसनासाठी बुद्धिबळ या खेळाचा कशा प्रकारे उपयोग करता येईल, यासंबंधी जगातील विविध देशांमधून आलेले तज्ञ चर्चा करणार आहेत.
या उपक्रमाविषयी माहिती देताना ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे म्हणाले की, ‘१९ जूनपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. यामध्ये चर्चासत्रे, परिसंवाद आणि मुलाखती याचा समावेश आहे. व्यवस्थापन कसे असावे यापासून स्थानिक पातळीवर जेलमध्ये स्पर्धा कशा घेण्यात यावा अशा विषयावरील ही चर्चासत्रे असतील. आभासी (ऑनलाईन) पद्धतीने होणाऱ्या या चर्चासत्रात जगभरातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.’
हा उपक्रम आणि बुद्धिबळ स्पर्धांचा कार्यक्रम इंडियन ऑईलच्या वतीने पुरस्कृत करण्यात आला आहे. यावेळी इंडियन ऑईलच्या वेस्टर्न रिजन कार्यालयाच्या(कॉर्पोरेट कम्युनिकेश)चे महाप्रबंधक झुबीन गर्ग आदी उपस्थित होते.