पुणे – मानसिक रुग्णांचा टक्का वाढता वाढता वाढे…!

मोबाइल आणि सोशल मीडियाचा परिणाम


आठ महिन्यांत वाढलेत दहा हजार रुग्ण


तरुण पिढी आणि महिलाही पडताहेत बळी

– नाना साळुंके

पुणे – विविध टीव्ही वाहिन्यांवरील जीवघेण्या मालिका, सोशल मीडिया आणि मोबाइल आणि ऑनलाइन गेम्सची सवय या बाबी नागरिकांच्या जीवास घातक ठरत असल्याची बाब उघडकीस आल्या आहेत. या सर्व बाबींमुळे मानसिकतेवर परिणाम होत आहे. विशेष म्हणजे या घटकांना सध्याची तरुण पिढी बळी पडत असून त्यामध्ये गृहीणींची वाढणारी संख्या चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गेम खेळणे अथवा सतत सोशल मीडिया वापरणे हे व्यसन जीवावर उठत असल्याचे समोर येत आहे.

मोबाइल आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे गेल्या तीन वर्षांत रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असून यंदा तर अवघ्या अवघ्या आठ महिन्यांत या रुग्णसंख्येत तब्बल दहा हजारांनी वाढ झाली आहे. येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील मानसिक रुग्णांच्या आकडेवारीवरुन ही बाब अधोरेखित झाली आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत मानसिक रुग्णांचा टक्का कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत, हा टक्का कमी करण्यासाठी शासन आणि विशेषत: आरोग्य विभागाच्या वतीने विविध औषधे आणि उपचारांच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक पातळीवरील औषधांचा आणि त्यांच्या पेटंटचा वापर करण्यात येत आहे. या पेटंटच्या माध्यमातून या रुग्णांची टक्केवारी कमी होईल, असा शासनाचा अंदाज होता. विशेष म्हणजे, एडसग्रस्त रुग्णांसह या रुग्णांनाही जास्तीच्या सवलती आणि सेवा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत जाहीर झालेल्या आकडेवारीवरुन शासनाचा हा प्रयत्न फोल ठरल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अखत्यारीत पुण्यासह नगर, औरगांबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा आणि जालना या बारा जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांच्या मुख्यालयाच्या आरोग्य केंद्रांमध्ये मानसिक रुग्णांसाठी औषधे देण्याची व्यवस्था असली तरी दर्जेदार औषधे आणि तातडीच्या उपचारासाठी येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येते. गेल्या तीन वर्षांतील हा टक्का कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

रुग्णांचे नव्हे, कुटुंबांचे समुपदेशन व्हावे
मनोरुग्ण म्हणजे कुटुंबांच्या दृष्टीने एक अडचण असल्याची बहुतांशी कुटुंब प्रमुख आणि अन्य सदस्यांची झाली आहे. या भावनेतूनच या रुग्णांची कुचेष्टा आणि त्यांची हेटाळणी करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळे अशा रुग्णांना घरात न ठेवता त्यांची रवानगी मनोरुग्णालयात करण्याचा कल वाढत आहे. परिणामी, अशा रुग्णांना आराम पडण्याच्या ऐवजी त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन या रुग्णांच्या कुटुंबांचे समुपदेशन करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना गेल्या काही वर्षांत प्रयत्न करण्यात येत असून त्याला अपेक्षित यश येत आहे अशी माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजित फडणीस यांनी “प्रभात’ शी बोलताना दिली.

मनोरुग्णांची संख्या वाढत असली, तरीही त्यांना अपेक्षित वैद्यकीय सुविधा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. आगामी काळात मनोरुग्णांचा हा टक्का कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासंदर्भात सर्व कर्मचारी आणि डॉक्‍टरांना सूचना करण्यात आल्या आहेत.
– डॉ. अभिजित फडणीस, अधिष्ठाता, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)