पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे मंगळवारी 198 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लस उपलब्ध असणार आहेत. कोविशिल्डचे 187 केंद्रांवर प्रत्येकी 250, तर कोवॅक्सिनचे 11 केंद्रांवर प्रत्येकी 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 5 टक्के असून, ऑन दी स्पॉट बुकिंगही 5 टक्के आहे. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे. त्यातील 5 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 5 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
3 ऑगस्टपूर्वी पहिला डोस घेतलेल्यांना जी लस मिळणार आहे, त्याचे ऑनलाइन बुकिंग 45 टक्के, तर 45 टक्के ऑन दी स्पॉट बुकिंग होणार आहे. 28 सप्टेंबरला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्यांना 45 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर 45 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे. याशिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही प्राधान्याने लस देण्यात येणार आहे; मात्र त्यासाठी ओळखपत्र आवश्यक आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.