पुणे – समाविष्ट 11 गावांमधून करवसुली वाढवा

आयुक्‍तांचे आदेश : 300 कोटी रुपयांचे उत्पन्न वाढण्याचा दावा

पुणे – महापालिका हद्दीत समाविष्ट 11 गावांमधील कर आकारणी झालेली बांधकामे आणि प्रत्यक्ष बांधकामांची स्थिती पाहता, या गावांमधून मिळकतकरातून 300 कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो. त्यासाठी कर संकलन विभागाने पुढाकार घ्यावा, अशा सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महसूल समितीच्या बैठकीत प्रशासनास दिल्या आहेत. त्यासाठी आवश्‍यक अससलेली सर्व यंत्रणा या विभागास देण्यात येईल. मात्र, वसुलीची जबाबदारी घेतली जावी असेही त्यांनी या बैठकीत सांगितले.

महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी पालिकेकडून महसूल समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत 11 गावांमधील कर वसुलीबाबत आयुक्तांनी चर्चा केली. या गावांमधे कर आकारणी झालेल्या केवळ 1 लाख 20 हजार मिळकती असून प्रत्यक्षात या मिळकतींची संख्या तीन ते चार पट अधिक आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या गावांचे सर्वेक्षण करून जास्तीत जास्त नागरिकांना कर आकारणीत आणावे. त्यासाठी या विभागाने पालिकेचे अतिरिक्‍त कर्मचारी नेमून, खासगी संस्था अथवा कंत्राटी कर्मचारी नेऊन सर्वेक्षण करावे अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.