हडपसर (प्रतिनिधी) :- बाळासाहेबांच्या शिवसेनेत हडपसर विधानसभा मतदारसंघात जोरदार इनकमिंग सुरु आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख, माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या उपस्थितीत सारसबाग येथील पक्ष कार्यालयात हडपसर मतदार संघातील शेकडो महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला.
नुकतेच केशवनगर, मांजरी येथील तरुणांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला होता. तर आता मतदार संघातील शेकडो महिलांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे ,महिला शहर प्रमुख लीना पानसरे, उपशहर प्रमुख चैत्राली गुरव, श्रद्धा शिंदे, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर यांच्या उपस्थितीत या महिलांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे.
“राज्य शासनाची ताकद आपल्या पाठीशी असून मी शहर तसेच प्रभाग व मतदार संघातील विकासकामे तसेच नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. या भागातील संघटित महिला आणि त्यांच्या बचत गटांसाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून योजना राबविल्या जातील.
– नाना भानगिरे(शहर प्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना ,पुणे शहर)
कार्यकर्त्यांनी आणि आता शेकडो महिलांनीही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या इनकमिंगमुळे शिंदे गटाची ताकद हडपसर मतदार संघात वाढत चालली आहे.