Pune Crime News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नुकतीच पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील एका विवाहितने सासरचा त्रास असह्य झाल्याने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या आई हेमलता बाळासाहेब मगर (वय ५०, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्यांनी अनेक गंभीर आरोप सासरच्यांवर केले आहेत. यामुळे पुणे (Pune) जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दीप्ती रोहन चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिने शनिवारी रात्री गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. पती रोहन कारभारी चौधरी, सुनीता कारभारी चौधरी, सासरे कारभारी चौधरी, रोहित कारभारी चौधरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे सुनीता चौधरी या माजी सरपंच आहेत. तर कारभारी चौधरी हे पेक्षाने शिक्षक आहेत. अशा सुशिक्षित घरातील विवाहितने आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सर्वजण कडवस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली येथील रहिवासी आहेत. हेही वाचा : Shehnaaz Gill: शिक्षण सोडलं, घरातून बाहेर पडली आणि स्टार बनली; ‘पंजाबची कॅटरीना’ शहनाज गिलचा संघर्षमय प्रवास तक्रारीत काय आरोप करण्यात आले आहेत? दीप्तीची आई हेमलता बाळासाहेब मगर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मोठे आरोप केले आहेत. लग्नानंतर काही दिवसांतच दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ सुरू केला. याबाबत दीप्तीने माहेरी सांगितले होते. मात्र, लेकीचा संसार व्हावा, यासाठी तिची समजूत घालून माहेरच्यांनी एकदा १० लाख रुपये रोख, गाडी घेण्यासाठी २५ लाख रुपये दिले होते. यानंतरही चारचाकी गाडी घेण्यासाठी सासरच्यांनी अजून पैशांची मागणे सुरूच ठेवली होती. असे तक्रारीत म्हटले आहे. २०१९ मध्ये दीप्तीचे लग्न मोठ्या थाटात घरच्यांनी करून दिले. शाही पद्धतीने झालेल्या लग्न सोहळ्यात माहेरच्या लोकांनी लग्नात ५० तोळे सोने, लग्नानंतर मुलीचा संसार टिकावा म्हणून ३५ लाख रोख रक्कमही दिली होती. Pune Crime News गर्भपात केल्याचाही आरोप पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये दीप्तीचा गर्भपात केल्याचंही समोर आले आहे. दीप्तीच्या पोटातील बाळ हे मुलगी असल्याचे समजल्यावर माझे पती रोहन, सासु सुनिता व सासरे कारभारी व दीर रोहित यांनी माझी इच्छा नसताना जबरदस्तीने माझा गर्भपात केला आहे, असे तिने मला सांगितले होते. तेव्हा मला धक्का बसला. परंतु मी तिला आधार देत समजावून सांगितले, असे हेमलता मगर यांनी तक्रारीत म्हटले. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत असून विवाहितेच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा : Sayaji Shinde : “कुठलाही रंंग कोणाच्या…”; सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानानंतर सयाजी शिंदेंची संतप्त प्रतिक्रिया