पुणे – स्मार्ट सिटी ऑपरेशन्स सेंटरचे उद्या उद्‌घाटन

पुणे – स्मार्ट सिटी ऑपरेशन्स सेंटर (एससीओसी) या शहरातील महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे उद्‌घाटन दि.9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सणस ग्राऊंड येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे उद्‌घाटन होईल.

महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

शहरातील महत्त्वाकांक्षी 155 कोटी स्मार्ट इलेमेन्टस प्रकल्पांतर्गत पुणे स्मार्ट सिटीने हा प्रकल्प विकसित केला आहे. हे सेंटर कमांड आणि कंट्रोलसाठी आहे. हे शहरातील विविध कामकाजांची देखरेख आणि व्यवस्थापन करण्यासाठी पुण्यातील विकसित स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्‍चरला सध्याचे स्मार्ट इलेमेन्ट्‌स आणि भविष्यातील आयटी इन्फ्रास्ट्रक्‍चरसह सामावून घेणार आहे. हे सेंटरचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यामध्ये 25 ऑपरेटर्सची क्षमता आणि सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.

सध्या 700 स्मार्ट इलेमेन्ट्‌स येथील कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटरशी जोडलेले आहेत. यामध्ये वाय-फाय हॉट स्पॉट्‌स, पर्यावरणीय सेन्सर, सार्वत्रिक घोषणा, आपत्कालिन प्रतिसाद-इमर्जन्सी कॉल बॉक्‍स आणि व्हेरिएबल मेसेजिंग सिस्टिम्स यांचा समावेश आहे. आगामी काळात वाहतूक पोलीस, पीएमपीएमएल या इतर विभागांच्या ई-चलन, आयटीएमएस, सर्व्हेलन्स, स्मार्ट लायटिंग अशा यंत्रणांचे एससीओसी सोबत संलग्नीकरणही पूर्ण झाल्याचे महापौरांनी सांगितले. महापालिकेच्या सेवांशीही ते संलग्न करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)