पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गुरूवार पेठेतील जनसंपर्क कार्यालयाचे नुकतेच पक्षाचे शहराध्यक्ष आ. चेतन तुपे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अण्णा थोरात हे होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर कार्यकारीणी सदस्य हेमंत येवलेकर यांच्या पुढाकाराने हे कार्यालय सुरू झाले आहे. यावेळी बोलताना आमदार तुपे म्हणाले की शहराच्या पुर्व भागातील नागरीकांच्या अडचणी सोडवण्या करीता या कार्यालयाचा चांगला उपयोग होईल.
या भागात पक्ष बळकटीचे काम करणाऱ्यांना पक्षातर्फे ताकद देण्याचे काम यापुढील काळात केले जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला पक्षाचे पुर्व भागातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात शंकर शिंदे, गणेश नलावडे, विजय खराडे, प्रकाश बहादुरपुरे, संजय गाडे, अनिल दामजी, किरण पोकळे इत्यादींचा समावेश होता. हेमंत येवलेकर यांनी स्वागत केले.