पुणे – पोटनिवडणुकीत भाजप दोन, तर राष्ट्रवादी एका जागेवर विजयी

पुणे – पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 42 (अ) पुरूषांमधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गणेश ढोरे आणि (ब) महिलांमधून भाजपच्या अश्‍विनी पोकळे विजयी झाल्या. तर प्रभाग क्रमांक 1 मधून पोटनिवडणुकीत भाजपच्या ऐश्वर्या जाधव या विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रेणुका चलवादी यांना 3 हजार 65 मतांनी पराभूत केले.

या निवडणुकीत भाजपला दोन, तर राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाले. यामध्ये प्रभाग क्र.42 मध्ये एकूण 1 लाख 96 हजार मतदार होते. त्यापैकी 51 हजार 429 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. फक्त 27.57 टक्के मतदान झाले. प्रभाग क्र.1 एकूण 68 हजार 346 मतदार होते. त्यापैकी 15 हजार 205 मतदारांनी मतदान केले. यानुसार 22.25 टक्के मतदान झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.