Pune : घराचे छत कोसळून पती-पत्नी जखमी

पुणे – शहरातील खडकमाळ आळी येथील घर क्रमांक 646 येथे जुन्या घराचे छत व भिंत पडल्याने पती-पत्नी किरकोळ जखमी झाले. सिमा किशोर रावडे (वय.46) किशोर बबनराव रावडे (वय.52) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असून, त्यांची प्रकृती चांगील असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.

ही कामगिरी स्टेशन ऑफिसर प्रमोद सोनवणे व अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर व जवान अतुल मोहिते, प्रदीप पवार, चंद्रकांत गावडे, दिगंबर बंदावडीकर, अजीम शेख, स्वप्नील टुले, परेश जाधव, चंद्रकांत मेणुसे यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.