विश्रांतवाडी – वडगावशेरी तसेच शिवाजीनगर मतदार संघातील शेकडो महिलांनी राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
वडगावशेरी मतदारसंघाच्या महिला विभाग अध्यक्षा वंदना साळवी व शिवाजीनगर विभाग अध्यक्षा लावण्या शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शहराध्यक्षा रूपाली ठोंबरे-पाटील, नीता पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांनी प्रवेश केला. महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयात प्रवेशोत्सव पार पडला.