पुणे : घरफोडी आणि दागिणे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

स्वारगेट पोलिसांची कामगिरी...

पुणे (प्रतिनिधी) – शहरात घरफोडी करणाऱ्या तसेच प्रवाशांचे दागिणे चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून 2 लाख 80 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याकडून स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेले चार गुन्हे उघड झाले आहेत. सर्फराज इकबाल मोमीन ( 22, रा. सय्यदनगर, गल्ली नं. 12, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वारगेट पोलीस स्टेशनकडील सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक सुरेश जायभाय व तपास पथक गस्त घालत असताना हवालदार सचिन कदम, पोलिस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना मोमीन बद्दल खबर मिळाली होती. त्यानूसार त्याला हॉटेल नटराज जवळ सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

त्याची कसून चौकशी केली असता, त्याने स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार गुन्हयांची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून सोन्याची पाटली, सोन्याची बांगडी, सोन्याचे चॉपर व चांदीची भांडी इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तो स्वारगेट एसटी बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे दागिने सराईतपणे चोरत होता.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्ष सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलीस अंमलदार सचिन कदम, विजय कुंभार ,विजय खोमणे,ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, सोमनाथ कांबळे, संदिप साळवे, लखन ढावरे ,वैभव शितकाल, शंकर गायकवाड, ऋषिकेश तिटमे यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.