पुणे – कोथरूडमधूनच सर्वाधिक मताधिक्‍य देणार

आमदार मेधा कुलकर्णी यांचा दावा

पुणे – कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या लोकसभा उमेदवाराला या वेळी 1 लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍य मिळेल, असा दावा भाजपच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. या मतदारसंघात प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून शिवसेना तसेच भाजपचे पदाधिकारी संयुक्‍तपणे प्रचारात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कुलकर्णी म्हणाल्या, “मागील लोकसभा निवडणुकीवेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे अवघे 2 नगरसेवक होते. मात्र, त्यानंतरही पक्षाचे उमेदवार असलेल्या अनिल शिरोळे यांना 91 हजार मताधिक्‍य एकट्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून होते. या वेळी या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे 23 नगरसेवक असून गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात झालेली विकासकामे पाहता मतदारांमध्ये भाजपबाबत चांगले मत आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्‍य दिले जाईल. तसेच हे मताधिक्‍य एका लाखांच्यावर असेल. दरम्यान, येत्या 14 एप्रिल रोजी सर्व मतदारसंघात एकच दिवशी लोकसभा उमेदवार गिरीश बापट यांच्या माहितीची पत्रके सर्व मतदारसंघात वाटप केली जाणार असून कोपरा, सभा, सोसायटी भेट, मेळावे तसेच भेटीगाठींच्या माध्यमातून प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.