कोंढवा – अनेक वर्षांपासून हडपसर मतदारसंघाचा कोणताही विकास झालेला नाही. उलट झपाट्याने नागरीकरण वाढत असताना सुनियोजित विकास न होता हडपसरची सर्व क्षेत्रांत दुरवस्था झाली आहे. जीवघेण्या वाहतूक कोंडीसह अनेक समस्यांनी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. हडपसरचा सर्वांगीण विकास करण्याची धमक फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे, असा विश्वास मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांनी व्यक्त केला.
हडपसर मतदारसंघातील पदयात्रांना साईनाथ बाबर यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे परिसर मनसेमय झाला आहे. हडपसरची जनता सुज्ञ असून, यावेळी बाबर यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास कार्यकर्ते व पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना साईनाथ बाबर म्हणाले, आपण हडपसरची जीवघेणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विकास आराखड्यातील डीपी रोड ताब्यात घेऊन नवीन पर्यायी मार्ग विकसित करणार. बायपास रस्ते, कॅनाॅलवर पक्के रस्ते बांधणार.
रोजगार मिळावा यासाठी लघु उद्योग निर्मिती, मेगा प्रोजेक्ट येण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून येथील बंद पडलेल्या औद्योगिक वसाहती पुन्हा सुरू करणार. फसलेले उड्डाणपूल दुरुस्त करून चांगली वाहतूक व्यवस्था करणार, रखडलेली उड्डाणपूलांची कामे तत्काळ मार्गे लावणार, पाणीसमस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करणार. हडपसरचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
महाराष्ट्र ब्राह्मण संघाचे पत्र
साईनाथ बाबर आपण आता पर्यंत केलेल्या उत्कृष्ट कामाची पोच पावती व शब्बासकी म्हणून २०२४ च्या विधानसभेत आपला विजय बहुमतानी व्हायलाच हवा यासाठी महाराष्ट्र ब्राम्हण संघ आपल्याला जाहीर पाठींबा देत आहे. व या निवडणूकीत सहभागी होत असल्याचे पञ महाराष्ट्र ब्राम्हण संघाचे अध्यक्ष दिनकर दत्तात्रय कुलकर्णी यांनी साईनाथ बाबर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.