शिरुर ( अरुणकुमार मोटे ) : शिरुरमधील महिलांनी महिला सुरक्षाची राखी कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांना बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे. रक्षाबंधन हा सण सर्व ठिकाणी साजरा केला जातो. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण,यावेळी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून अनेक गिफ्ट देत असतात. परंतु महिलांनी सध्या महिलांवर अनेक अत्याचार होत आहे. अनेक अडचणी सामोरे जावे लागत आहे. म्हणून शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांना भाऊ मानून त्यांचाकडे ओवाळणी म्हणून महिला सुरक्षेची मागणी केली आहे.
या राखी मध्ये महिला सुरक्षा,महागाई निर्मूलन,महिला सबलीकरण,युवकांचे भविष्य,शेतीमालाला हमीभाव,शिक्षण आणि आरोग्य असे त्यात लिहिले होते. बहिणीला कोणते पैसे नको,पण सुरक्षा हवी आहे हे यावरून बोध होते. एक आगळी वेगळी राखी बांधून हा रक्षाबंधन सण साजरा केला.यावेळी शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी सर्व बहिणीची सुरक्षा जबाबदारी घेईल असे सांगितले.
यावेळी रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा – राणी कर्डिले,राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष युवती अध्यक्षा – गीता आढाव,साधना महासंघ अध्यक्षा – साधना शितोळे,रोहिणी बनकर,संगीता शेवाळे, डॉ.. स्मिता बोरा,ज्योती लोखंडे,राणी शिंदे,शशिकला काळे,सविता बोरुडे,बेबीताई शितोळे,छाया अल्हाट,सारिका विर्सेव,प्रतीक्षा पवार,कल्पना चांदगुडे,प्रीती बनसोडे,राजश्री शेजवळ, जया खांडरे,दुर्गा ननवरे,कल्पना पुंडे,मंगल गायकवाड,ललिता पोळ,अनेक महिला मान्यवर उपस्थित होत्या.