वाघोली : वाघोली तालुका हवेली येथे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असून पुन्हा एकदा सर्व विभागांच्या सहकार्याने योग्य त्या उपाययोजना करून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस कार्यरत राहणार असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.
वाघोली तालुका हवेली येथील वाहतूक नियंत्रण समितीचे मुख्य कार्यवाहक संपत गाडे, नवनाथ गाडे, सनी अन्सारी व लोणीकंद वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी वाघोली येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती अप्पर पोलीस आयुक्तांना दिली.
अप्पर पोलीस आयुक्तांनी वाघोली आणि परिसरात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन व इतर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शक्य योग्य त्या उपाययोजना करून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाय योजना करण्यात येईल असे आश्वासन वाहतूक नियंत्रण समितीला दिले असल्याचे मुख्य कार्यवाहक संपत गाडे यांनी सांगितले.
अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक विभागाचे उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी वेळोवेळी भेट देऊन वाघोली येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ग्रामस्थांना मोलाची मदत केली आहे. यापुढील काळात देखील पोलीस यंत्रणा व विविध विभागांच्या वतीने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी योग्य त्या उपाययोजनांबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे संपत गाडे यांनी सांगितले.