शिरूर – शिरूर शहरातील भापजाचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांच्यासह १६ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला असल्याचे ते सांगत असले तरी ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहीती असून याची चर्चा आता शिरूर तालुक्यात जोर धरू लागली आहे.
नितीन पाचर्णे यांनी स्व.मा.आमदार बाबुराव पाचर्णे यांनी कष्टाने वाढवलेला भाजपा पक्ष सोडणार नसल्याचे सुतोवाच केले होते.परंतू ते आता पक्ष बदलणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.
पाचर्णे यांच्या निधनानंतर शिरूरमध्ये भाजपच्या एकाही स्थानिक नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला पक्ष संघटन टिकवता आले नाही. त्यामुळे भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्यानंतर पक्षात कोणीही तेवढ्या ताकतीचा नेता उरला नाही.
आता १६ जणांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपचा बालेकिल्ला शिरुरमधून पुर्णपणे नेस्तणाभुत होऊ लागला आहे. याचे पडसाद आगामी विधानसभा, नगर परिषद, जिल्हा परिषद ऊमटणार असून नितिन पाचर्णे कोणत्या पक्षात प्रवेश करतात ते पाहणे महत्वाचे ठरेल.