पुणे जिल्हा: ग्रामीण भागातही आता बाधितांचे प्रमाण 19.3 टक्‍के

पुणे -ग्रामीण भागात मागील महिन्यापासून करोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. प्रत्येक आठवड्याला बाधितांची संख्या एक हजाराच्या पुढे पोहचलेली असून, मागील आठवड्यामध्ये त्याचे प्रमाण आणखीन वाढले आहे. एकट्या ग्रामीण भागात बाधित सापडण्याचे प्रमाण आज 19.3 टक्के इतके आहे.

ग्रामीणमध्ये 23 ते 29 जानेवारी रोजी 11 हजार 676 नमुने तपासणीमध्ये 1 हजार 65 जणांचा अहवाल पॉझीटीव्ह आला. दुसऱ्या आठवड्यातही बाधित संख्या एक हजाराच्या पुढे होती. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही संख्या कमी झाली तरी तिसऱ्या आठवड्यात हीच संख्या 1 हजार 129 वर पोहचली आहे.

आठ दिवसांतील बाधित संख्येमध्ये दररोज 153 ते 192 च्या आसपास संख्या सापडली आहे. ग्रामीण भागातील एकूण 89 हजार 897 बाधितांपैकी आतापर्यंत 86 हजार 518 बाधित करोनामुक्त झाले आहे. ग्रामीणमध्ये करोनामुक्तीचे प्रमाण 96.24 टक्के इतके आहे. मागील तीन महिन्यात चार ते पाच टक्कयांनी हे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.

30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान, 1 हजार 44 बाधित सापडले तर 1 हजार 991 बाधित करोनामुक्त झाले. 6 ते 12 फेब्रुवारीदरम्यान 987 नवीन बाधित सापडले तर 1 हजार 50 करोनामुक्त झाले. मात्र, या आठवड्यात 1 हजार 129 नवीन बाधित सापडले तर 1 हजार 65 बाधित करोनामुक्त झाले, म्हणजेच हे प्रमाण 94 टक्कयांवर आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.