शिरुर – शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील एका वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून डाव्या कानाची पाळी कापून चोरट्यांनी महिले कडील सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहे.
याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रतनबाई बापु थोरात (वय 55 वर्षे. व्यवसाय शेती व मेंढपाळ रा उरळगाव थोरातवस्ती ता शिरूर) यांनी फिर्याद दिली असून दिनांक 29 जुलै रोजी दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास उरळगाव गावच्या हद्दीतील नंदनवन हॉटेल जवळ माळरानाजवळ रतनबाई मेंढ्या चारत असताना.
अंदाजे 25 ते 30 वयोगटातील तीन अनोळखी इसम मोटार सायकलवरुन वृद्ध महिलेजवळ आले असता. त्यापैकी कमी उंचीने असलेल्या इसमाने रतनबाईना खाली पाडले व ओरडू नकोस नाहीतर चाकूने भोसकेन असा दम देवुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसुत्र जबरदस्तीने तोडुन घेतले व हातातील चाकुनी डाव्या कानाची पाळी कापुन रतनबाई यांना गंभीर जखमी करून दागिने जबरदस्तीने
चोरून नेले.
मनी मंगळसुत्र त्यात 01 तोळा वजनाचे सोन्याचे मणी व 01 तोळा वजनाचे आक्कासाहेब डोरले असे एकुण 02 तोळे वजनाचे दागिने व अडीच ग्रॅमचेकानातील फुलाच्या नक्षीचे सोन्याचे कर्णफुल जोडी चोरुन नेली असून. यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्यामार्गदर्शना खाली पुढील तपास पी.एस.आय सुनिल उगले हे करीत आहेत.