जेजुरी – जेजुरी-सासवड रस्त्यावरील वरील बेलसर गावचे हद्दीतील वेश्यावसाय सुरू असणाऱ्या लक्ष्मी नारायण लॉजवर जेजुरी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवीत छापा टाकून कारवाई केली. यात वेश्याव्यवसायासाठी पश्चिम बंगालमधून आणलेल्या दोन मुलींची सुटका करण्यात आली. तर लॉज व्यवास्थापकास अटक करण्यात आली आहे.
जेजुरी पोलिसांनी लॉज व्यवस्थापक रामा नारायण मोगाविरा (वय 38, रा. वडकी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जेजुरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जेजुरी-सासवड मार्गालगत असणाऱ्या लक्ष्मी नारायण लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी सोमवरी (दि. 23) सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास लॉजवर एक बनावट ग्राहक पाठवले.
बनावट ग्राहकाने खात्री करून पोलिसांना इशारा केला असता पोलिसांनी छापा टाकला. यात वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या पश्चिम बंगालमधून आणलेल्या दोन मुली आढळून आल्या. ही कारवाई जेजुरीचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार नंदकुमार पिंगळे, पोलीस हवालदार एन.आर.दोरके, पोलीस नाईक गणेश नांदे यांनी पार पाडली.