बारामती – सुप्रसिद्ध चिकन लेगपीस रील स्टार उल्हास कामटे यांनी बारामती शहरातील सुप्रसिद्ध हॉटेल ग्रॅंड येथे भेट दिली. हॉटेल ग्रॅंडमधील अस्सल स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. बारामतीकर खवय्याची लज्जत वाढवणारे एकमेव हॉटेल म्हणजे हॉटेल ग्रॅंड, असे मत उल्हास कामटे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी हॉटेलच्या वतीने कामटे यांचा सत्कार करण्यात आला.
स्वादिष्ट भोजनामुळे हॉटेल ग्रॅंड खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे. हॉटेल ग्रॅंडमधील तंदूर, मच्छी, चिकन मुर्गमस्लम, चिकन मसाला, लॉलीपॉप, मटन दम बिर्याणी, चिकन तंगडी बिर्याणी, सोलकढी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मेंबर थाळी, पनीर राजवडी, पनीर पसंदा या व्हेज व नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद उल्हास कामटे यांनी घेतला. हॉटेलच्या रचनेचे कौतुक केले.
यावेळी बारामती नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, सचिन पलंगे, निलेश धालपे, निलेश शेंडगे, निलेश मोरे, उमेश दुबे, संतोष उबाळे, मोहसीन मणियार, रोहन माघाडे, नागेश कासार, मंगेश पवार यांसह युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत हॉटेलचे मालक सत्यव्रत अर्जुनराव काळे व यथार्थ काळे यांनी केले.
अल्पावधीतच हॉटेल ग्रॅंड बारामतीकरांच्या पसंतीस उतरले आहे. व्हेज नॉनव्हेज मधील वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन डिशेस खवय्यांना चाखायला मिळतात. त्यामुळे ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते. रिल्स स्टार उलास कामटे यांनी शनिवारी (दि. 21) हॉटेलला भेट दिली. विविध पदार्थांचा त्यांनी आस्वाद घेतला. व हॉटेलचे कौतुकही केले.
-सत्यवत काळे, मालक हॉटेल ग्रॅंड