कडूस -येथे दि. 26 व 27 मार्चला बैलगाडा शर्यतीचे आणि 28 मार्चला इनामी कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उद्योजक प्रताप ढमाले यांनी दिली. दोन्ही दिवशी फायनलमध्ये जिंकणा-या बैलगाडा मालकांना प्रसिद्धी पत्रकात जाहीर केल्याप्रमाणे आकर्षित बक्षिसे देण्यात येतील.
खेड तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीची पूर्व तयारी अंतिम टप्प्यात अंतिम टप्प्यात आली आहे. 24 मार्चला कडूस येथे सकाळी आठ वाजेपासून लकी ड्रॉ पद्धतीने टोकन काढण्यात येणार् आहे. टोकनसाठी बैलगाडा मालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रा कमिटीचे बाळासाहेब बोंबले, आप्पा धायबर यांच्यावतीने करण्यात आले आहे. घाटातील प्रत्यक्ष शर्यतीचे लाईव्ह तसेच गावात भैरवनाथ मंदिर व एस टी स्टॅंड येथे स्क्रिनद्वारा प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे.
दि. 26 रोजी शर्यतीनिमित्ताने खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील, महेश लांडगे, माजी जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, सदस्य अतुल देशमुख, कैलास सांडभोर, उद्योजक संजय घनवट, विनायक घुमटकर, अरुण चांभारे, अंकुश राक्षे, अभिजित शेंडे, उल्हास कुडेकर, राहुल तांबे, सरपंच शेहनाज तुरूक, माजी सरपंच निवृत्ती नेहेरे, उपसरपंच अनिकेत धायबर तसेच गावपातळीवरील व तालुक्यातून विविध संस्थांचे पदाधिकारी, बैलगाडा शौकीन मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती यात्रा उत्सव समितीच्या सुत्रांनी दिली.
बैलगाड्यासाठी भव्य बक्षिसे.
प्रथम क्रमांक 1लाख 11 हजार 111 रुपये, द्वितीय 77 हजार 777 रूपये, तृतीय 55 हजार 555 रूपये, चतुर्थ 33 हजार 333 रूपये, पंचम क्रमांक 22 हजार 222रुपये. फळीफोड गाड्यांसाठी बैलगाडा शौकीन मान्यवरांनी अनुक्रमे प्रथमसाठी 11,111. द्वितीयसाठी 7,777. तृतीयसाठी 5,555. चतुर्थसाठी 4,444 तर पंचमसाठी 2,222 रुपये. या बरोबरच प्रत्येकाला यात्रा कमेटीच्यावतीने भव्य चषक देण्यात येणार आहे.