शिरूर : शिरूर शहरातील सरदार पेठेत जुन्या रागातून कृष्णा वैभव जोशी या आरोपीने इन्कमटॅक्सला चार वर्षापूर्वी अर्ज केल्याचा गैरसमजातून महेंद्र मोतीलाल बोरा यांना शिवीगाळ करत पिस्तुल काढुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने महेंद्र यांच्या छातीवर रोखुन “तुला आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देवुन पिस्तुलचा खटका दाबत असताना महेंद्र यांनी त्याचा हात बाजुला ढकलला.
तरी कृष्णा याने पिस्तुलाच्या वरील बाजुने मागे पुढे पिस्तूल ओढत असताना त्यातुन एक गोळी महेंद्र यांना न लागता तेथेच खाली रोडवर पडली. व महेंद्र बोरा बाल-बाल बचावले आहे. मात्र, जिवे मारण्याची धमकी देवुन कृष्णा तेथुन पळुन गेला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या, माहीतीनुसार दि. २० जानेवारी रोजी ९.३० वाजण्याच्या सुमारास मौजे शिरूर शहराच्या हद्दीतील सरदार पेठ येथील स्विटी प्रोव्हीजन स्टोअर्स समोर हलवाई चौक ते मारूती आळी रोडवर कृष्णा वैभव जोशी (रा .सरदार पेठ, शिरूर ) याचा महेंद्र मोतीलाल बोरा यांनी इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षापूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने कृष्णा दारू पिवुन महेंद्र बोरा यांच्या दुकानाजवळ येवुन त्यांना शिवीगाळ करून त्याने त्याचे जर्कीगमधील एक पिस्तुल बाहेर काढुन महेंद्र बोरा यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने छातीवर रोखुन मी तुला आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देवुन पिस्तुलचा खटका दाबत असताना बोरा यांनी त्याचा हात बाजुला ढकलला.
तरी देखील त्याने त्याचे हातामधील पिस्तुलचे वरील बाजुने मागे पुढे ओढत असताना त्यातुन एक गोळी तेथेच खाली रोडवर पडली व त्यांना जिवे मारण्याची धमकी देवुन कृष्णा तेथुन पळुन गेला आहे. या घटनेचा पुढील तपास पोसई चव्हाण हे करत असून आरोपीला तात्काळ गजाआड केले आहे. शिरूर तालुक्यात एकुण ४०५ परवानाधारक शस्त्र असून शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत १२१, रांजणगाव गणपती अंतर्गत ५०,शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत २३५ जणांना शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे.
शिरूर तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका असून भू माफिया ,वाळूमाफियांत यापुर्वी यांच्यात अनेकदा गोळीबार होऊन गंभीर घटना घडल्या आहेत. शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे नागरिक, तरूण बाळगत असल्याची चर्चा शिरूर तालुक्यात होत असून यापुढच्या काळातही अश्या गंभीर घटनांना सामोरे जावे लागणार आहे.
विषेश म्हणजे शिरूर तालुक्यातील एकाही महिलेकडे अधिकृत शस्त्र परवाना असल्याचे दिसत नाहीत. ग्रामीण भागात विनयभंग, छेडछाड, लैंगिक अत्याचार, बलात्कार असे महिलांविषयी गुन्हे मोठ्या संख्येने होत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आता अवैध शस्त्र तस्करींवर व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर करडी नजर ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा शिरूर तालुक्याचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही.