मंचर – मंचर कृषी महोत्सव पाहण्यासाठी शेतकरी व नोकरदार व्यवसायिकाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कृषी महोत्सवात नवनवीन कृषी तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया उत्पादने कृषी अवजारे मशिनरी, पशुसंवर्धन व पशुखाद्य ट्रॅक्टर्स व वाहन उद्योग इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लॅपटॉप व कम्प्युटर, महिला बचत गट स्टॉल ,डेरी व फोटो उद्योग वस्तू उत्पादन, शोभिवंत झाडांची रोपवाटिका, बांधकाम व्यवसायसाठी उपयुक्त असणाऱ्या स्टॉलवर प्रचंड गर्दी होत आहे.
विशेषतः मंचर येथील डॉ. दीपक घोडेकर यांच्या ओकार डेंटल स्टॉल बी 2 मध्ये दातासंदर्भात उपयुक्त माहिती देऊन दातदुखी व त्यावरील खर्च टाळण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे दाताची वार्षिक तपासणी करण्यासाठी जनजागृती केली जाते. तेथील स्टॉलला नागरिकांनी अधिक पसंती दिली आहे. विशेष आकर्षण म्हणजे खवय्यांसाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणासाठी खास उजनी धरणातील मासे, रुचकर असे शाकाहारी भोजन, आईस्क्रीम व रबडीचे विविध प्रकार,
फ्लेवरची चव नागरिक अनुभवत आहेत. या शेतकरी महोत्सवाचे आयोजन रोटरी क्लब मंचर व अनुसया महिला उन्नती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले आहे. अशी माहिती पुणे ऍग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष महेश मोरे यांनी दिली.
शेतकरी महोत्सवाची सर्व व्यवस्था रोटरीचे अध्यक्ष आदिनाथ थोरात, सचिन काजळे, जनार्धन मेगडे, प्रशांत बागल, माजी अविनाश ढोबळे, भूषण खेडकर, जयेश शिंदे, गोरक्ष थोरात व अनुसया महिला उन्नती केंद्राच्या सदस्यांनी पाहिली. सोमवार (दि. 30) पर्यंत कृषी महोत्सव सर्वांसाठी खुले राहणार असल्याचे अनुसया महिला उन्नती केंद्राच्या ज्योती निघोट यांनी सांगितले.
नवीन तंत्रज्ञान अवगत करा – वळसे पाटील
शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली पाहिजे. त्यासाठी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन नवीन तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे, असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. कृषी महोत्सवाला वळसे पाटील यांनी भेट दिली. महोत्सवाच्या नियोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, आनंद शिंदे, मच्छिंद्र गावडे, शरद बॅंकेचे माजी सभापती संजय गवारी,
सुभाष मोरमारे, गणपतराव इंदोरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष आदिनाथ थोरात, सचिन काजळे, प्रशांत बागल, जनार्धन मेंगडे, महेश मोरे, बाळासाहेब पोखरकर, ज्ञानेश्वर चव्हाण, सचिन चिखले, उद्योजक संतोष पिंगळे, अरविंद वळसे पाटील, अनुसया पतसंस्थेच्या अधिकारी ज्योती निघोट, गणेश कडलग यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. वळसे पाटील यांनी शेतकरी महोत्सवातील स्टॉलला भेटी दिल्या. अनेक उत्पादनाविषयी त्यांनी जाणून घेतले. महेश मोरे यांनी त्यांना प्रदर्शनाविषयी माहिती दिली.