वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील अनिल सातव पाटील फाउंडेशन तसेच ग्रामपंचायत सदस्या सुनिता सातव पाटील यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांमध्ये पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी जोपासून राबवलेल्या विविध उपक्रमांची समस्यांची माहिती असलेल्या दिनदर्शिकेचे उद्घाटन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या दिनदर्शिकेचे अनावरण शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके, माजी उपसरपंच समीर भाडळे, समाजसेवक सुनील जाधवराव, सागर गोरे आदी मान्यवरांच्या उपस्थिती देखील झाले. अनिल सातव पाटील तसेच सुनीता सातव पाटील यांच्या माध्यमातून वाघोली मधील विविध समस्या सोडवण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती व नागरिकांनी सोडलेल्या समस्या बाबत व्यक्त केलेले समाधान आदी बाबतची माहिती दिनदर्शिका असल्याने वाघोली सध्या दिनदर्शिकेची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.