मंचर – अर्धपीठ गणपती तीर्थक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे श्रीगणेश जयंती उत्सवानिमित्त रविवारी (दि. 22) आणि सोमवारी (दि. 23) बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी (दि. 25) समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे देवजन्माचे कीर्तन होणार आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
विजेत्या बैलगाडा मालकांना 2 लाख 38 हजार रुपये रोख, दोन मोटरसायकल, दोन दूरचित्रवाणी संच, 2 फ्रीज, 19 जुंपते बैलगाडे आणि चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. सोमवारी कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे यांचा वाढदिवसानिमित्त माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
बुधवारी (दि. 25) दुपारी श्रींच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाईल. शुक्रवारी (दि. 27) प्राथमिक शाळेचे विद्यार्थ्यांचा नृत्याचा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार रमा जोशी आणि पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या हस्ते होणार आहे.