इंदापूर : इंदापूर तालुक्यातील इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठान हे सामाजिक बांधिलकेतून विविध सामाजिक उपक्रम राबवत गोरगरीब, वंचीत घटकातील लोकांना न्याय हक्क व आधिकारसाठी आवाज उठविणारे, देश प्रेम व देशभक्ती वाढीस लावणारे हे युवकांचे संघटन आहे.
या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुरुवार (ता. २२ ऑगस्ट) रोजी सामाजिक बांधिलकी जपत चला, वाढवू रक्ताची नाती म्हणत. भव्य रक्तदान शिबिराचे तसेच इंदापूर तालुक्यातील रुग्णांना मोफत ॲम्बुलन्स सेवा यासाठी ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा गुरुकृपा सांस्कृतिक भवन मंगलकार्यालय दत्तनगर राहुल सिनेमागृह शेजारी इंदापूर येथे पार पडणार असल्याची माहिती आण्णासाहेब मंजुळे यांनी दिली.
या सोहळ्यात इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात येणार आहे. यावेळी तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक लोकप्रतिनिधी व हजारो युवक मान्यवर तसेच सामाजिक, सांस्कृतिक कला क्रीडा आणि प्रशाशकीय सेवेतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आण्णासाहेब मंजुळे यांनी दिली आहे.