वाघोली : वाघोली येथील उबाळेनगर परिसरात असणाऱ्या ‘आर्कलाईन लॉजिस्टीक्स अँड वेअरहाऊस’ या गोडावूनमधून १ कोटी ९ लाख ८३ हजार रुपयांचे तब्बल २८० लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कंपनीच्याच कामगारांनी केल्याचा संशय असून त्यांच्याकडे कसून चौकाशी केली जात आहे.सुरेश कुमार (रा. उबाळेनगर, वाघोली, नगर रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी बाळकृष्ण राऊत (वय ३८, रा. केसनंद) यांनी फिर्याद दिली आहे.
राऊत हे कंपनीत मॅनेजर आहेत. तर, आरोपी कामगार आहे. तो मागील दीड महिन्यांपासून याठिकाणी काम करीत होता. कमी पगार असल्याने त्याने शुक्रवारी (दि.११) काम सोडले होते. त्यानंतर सोमवारी (दि.१४) सकाळी चोरीची घटना उघडकीस आली होती. अधिक तपास पोलीस करीत आहेत.