मंचर – शिरूर लोकसभा मतदारसंघातून 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील शिवसंकुलनाथ जलतरण तलाव येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान आणि हास्य कवितांचा बहारदार कार्यक्रम प्रसंगी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे, जिल्हा परिषद सदस्य शरदराव बुट्टे पाटील, भाजपचे तालुकाप्रमुख डॉक्टर ताराचंद कराळे,
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख अरुण गिरे, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, संचालक योगेश बाणखेले, अशोक गव्हाणे, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, उद्योजक अशोकराव बाजारे, युवा नेते स्वप्निल बेंडे पाटील, मंचरचे माजी उपसरपंच धनेश मोरडे, युवा सेनेचे राष्ट्रीय विस्तारक सचिन बांगर, प्रवीण थोरात पाटील, संतोष डोके, शिवाजी राजगुरू यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर समाज व्यवस्था दुरुस्तीसाठी करावा. सद्यःस्थितीत समाजामध्ये विविध जाती-धर्मावरून आणि राजकीय नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमकी सुरू आहेत. त्यावर परखड लिखाण करून समाजजागृती करावी. माझ्या राजकीय जीवनात पत्रकारांनी मला फार मोठे स्थान दिले आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमांनी मला सहकार्य करावे .असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नामांकित कवींचे विनोदी कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी कवी अनिल दीक्षित, कवी दुर्गेश सोनार, कवी संतोष गाढवे, कवी डी.के.वडगावकर यांनी खास विनोदी शैलीत रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध के ले. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांचा विशेष सन्मान करून सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या. पत्रकार बांधवांनी मुक्तपणे संवाद साधला.यावेळी क ार्यक्रमाचे प्रास्ताविक भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी केले .आभार युवा सेनेचे राष्ट्रीय विस्तारक सचिन बांगर यांनी मानले.