पुणे-महावितरणच्या भरारी पथकाने फेब्रुवारी महिन्यात भोसरी, शिरूर व इंदापूर येथे धाड टाकून 8 कोटी 71 लाख रुपयांच्या 110 वीज चोरीच्या घटना उघडकीस आणल्या. इतर अनियमिततेच्या 100 प्रकरणात चार कोटी 29 लाखाची बिले देण्यात आलेली आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.
भोसरी परिसरात भरारी पथकाने धाड टाकून स्टोन क्रशर कंपनीची वीजचोरी उघडकीस आणली. या औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी ग्राहकास 8 लाख 38 हजार युनिटचे एक कोटी 66 लाख 92 हजार रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत शिरूर परिसरात धाड टाकून प्लास्टिक एंडस्ट्रीची वीजचोरी उघडकीस आणली. या औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून 5 लाख 06 हजार युनिटची वीजचोरी केलह. या ग्राहकाला 85 लाख 30 हजार रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.
तिसऱ्या घटनेत इंदापूर परिसरात आईस फॅक्ट्री कंपनीची वीजचोरी उघडकीस आणलेली आहे. या औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून 2 लाख 85 हजार युनिटची वीजचोरी केली. त्याला 51 लाख 69 हजार रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.