पुणे पदवीधर निवडणुकीच्या तयारीला प्रशासनाकडून वेग

सातारा -पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची राजकीय रणधुमाळी रंगात आली असून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या तयारीनेसुध्दा वेग घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे जिल्ह्यात दोन्ही सुमारे 66 हजार 782 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी सुमारे 185 मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी मतदारांची संख्या वाढविण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली असून त्याची राजकीय रंगत टीपेला पोहचली आहे. प्रामुख्याने भाजप विरूद्ध राष्ट्रवादी यांच्यात होणारी ही लढत प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.

जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघातील मतदारांची संख्या 59 हजार 71 इतकी असून शिक्षक मतदारसंघात 7 हजार 711 मतदार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मतदार कराड व सातारा तालुक्‍यात तर सर्वात कमी महाबळेश्‍वर तालुक्‍यात आहेत. मतदारसंघात पदवीधरचे जावळी 1 हजार 212 शिक्षक मतदारसंघाचे 140 मतदार आहेत. कराडमध्ये पदवीधरचे 15 हजार 581 तर शिक्षक मतदारसंघात 1 हजार 882, खंडाळा तालुक्‍यात पदवीधरचे 2 हजार 266 तर शिक्षक मतदारसंघाचे 404, खटाव तालुक्‍यात पदवीधरचे 3 हजार 578 तर शिक्षक मतदारसंघाचे 602 मतदार, कोरेगाव तालुक्‍यात पदवीधरचे 4 हजार 126 तर शिक्षक मतदारसंघाचे 644 मतदार, महाबळेश्‍वर तालुक्‍यात पदवीधरचे 548 तर शिक्षक मतदारसंघाचे 105 मतदार, माण तालुक्‍यात पदवीधरचे 3 हजार 480 तर शिक्षक मतदारसंघाचे 506 मतदार आहेत.

पाटण तालुक्‍यात पदवीधरचे 4 हजार 345 तर शिक्षक मतदारसंघाचे 585 मतदार आहेत. फलटण तालुक्‍यात पदवीधरचे 9 हजार 222 तर शिक्षक मतदारसंघाचे 771 मतदार आहेत. सातारा तालुक्‍यात पदवीधरचे 11 हजार 921 तर शिक्षक मतदारसंघाचे 1 हजार 689 मतदार आहेत. वाई तालुक्‍यात पदवीधरचे 2 हजार 792 तर शिक्षक मतदारसंघाचे 383 मतदार आहेत.

मतदान प्रक्रियेस विलंब लागण्याची शक्‍यता
जिल्ह्यात एकूण 176 मतदान केंद्रे असून त्यामध्ये 9 केंद्रांची वाढ झाली. कराड तालुक्‍यात सर्वाधिक 8 मतदान केंद्रे आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी 132 तर शिक्षक मतदारसंघासाठी 44 मतदान केंद्रे आहेत. एका केंद्रावर जास्तीत जास्त 700 आणि कमीत कमी 100 मतदार आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून 63 आणि शिक्षक मतदारसंघातून 35 उमेदवार या निवडणुकीत नशिब आजमावत आहेत. या उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. शिवाय करोना संसर्ग रोखण्यासाठी मतदान केंद्रावर उपाययोजना केल्या जाणार आहेत. या दोन्ही गोष्टींमुळे मतदान प्रक्रियेस वेळ लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर मतपेट्यांची संख्या वाढवावी लागणार आहे.

मतदान….1 डिसेंबर, सकाळी 8 ते 5
मतमोजणी……………..3 डिसेंबर
एकूण मतदार………शिक्षक 7711, पदवीधर…………………59071
शिक्षक मतदारसंघ मतदान केंद्रे….44
पदवीधर मतदारसंघ मतदान केंद्रे..132
मतदान अधिकारी…………..1276
आरोग्य कर्मचारी…………….201
क्षेत्रीय अधिकारी………………51
ओळखीचे पुरावे……….आधारकार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, पारपत्र.
निवडणूक निरीक्षक……………….नीलिमा केरकेट्टा, श्रीकांत देशपांडे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.