पुणे- कोथरूड परिसररातील वस्त्यांचा खुंटलेला विकासाला गती देण्याबरोबरच तेथील स्वच्छता, आवश्यक सोयी-सुविधा, नियोजनबध्द व बंदिस्त नाले, स्वच्छ शौचालय आणि सुसज्ज रस्ते असावे. महिला बचत गटांसाठी सभागृह उभारून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे मत महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी व्यक्त केला.
कोथरूड मतदारसंघातील लक्ष्मीनगर, हॅपी काॅलनी, गोसावी वस्ती, मावळे आळी, किष्किंधानगर, सुतारदरा, यासह ओटा वसाहत, पंडित जवाहर नेहरू वसाहत, गणेश नगर, एरंडवाणा गावठाण, संजय गांधी वसाहत, म्हाडा कॉलनी परिसरात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी मोकाटे यांनी संवाद साधला.
म्हात्रे पूल ते रजपूत विटभट्टीपर्यंत नदीकाठचा रस्त्याचे काम गेली अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या परिसरातील वस्ती व इमारती भागात लोकसंख्या वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत नागरी सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यामुळे या परिसराला विकासाची संजीवनी मिळावी, अशी मागणी शिवामंत्री आणि उमेश कंधारे यांनी केली.
पावसाळ्यात पुराचे पाणी वस्त्यांमध्ये घुसते. त्यामुळे सुरक्षित सीमाभिंत उभारणे, पूरग्रस्त वसाहतीमधील नागरिकांची नावे प्रॉपर्टी कार्डवर नोंदवणे अशी मागणीही नागरिकांनी केली. हे प्रश्न एकजुटीने सोडवू असे अश्वासन देत, परिसर स्वच्छ राहणे आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असाव्यात यासाठी मी कटीबध्द असल्याचे मोकाटे यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक शिवामंत्री, रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, प्रशांत बधे, वैशाली मराठे, गजानन थरकुडे, राजेश पळसकर, गोविंद थरकुडे, सचिन करले, उमेश कंधारे, हेमंत धनवे, वैभव दिघे यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.