पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पोलीस उपायुक्त परिमंडळ एकच्या कार्यालयात नुकतीच पार पडली. या बैठकीत गणेश मंडळांनी दर्शनाची व्यवस्था ऑनलाइन, फेसबुक व इन्स्टाग्रामवर करणार असल्याचे सांगितले.
विश्रामबाग पोलीस ठाणे येथे पोलीस उपायुक्त (परिमंडळ-1) डॉ. प्रियंका नारनवरे यांचे अध्यक्षतेखाली आगामी गणेशोत्सव-2021 च्या अनुषंगाने मानाच्या व महत्वाच्या गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
बैठकीत सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच मंडळांच्यावतीने प्रसाद कुलकर्णी (तांबडी जोगेश्वरी), प्रवीण परदेशी (गुरुजी तालीम मंडळ) नितीन पंडित, (तुळशीबाग गणपती मंडळ), अनिल सकपाळ (केसरीवाडा गणपती), महेश सूर्यवंशी (श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट), अण्णा थोरात (अखिल मंडई मंडळ), दीपक मारणे (बाबु गेणु गणपती मंडळ) संजीव मारणे (श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ), समीर शेलार (जिलब्या मारुती मंडळ), राहुल अलमखाने (होनाजी तरुण मंडळ), प्रमोद कोंढरे (नातूबाग तरुण मंडळ) आदी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.