पुणे : केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने दिला आहे.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहेत.
डिसेंबर २०२४ पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटीमार्फत करण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत योजनांचे जानेवारी ते मार्च, २०२५ चे अर्थसहाय्य, तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचे डिसेंबर २०२४, जानेवारी ते मार्च २०२५ या महिन्यांचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारेच करण्यात येणा असून, योजनांसाठी बँकेत उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.