पुणे : पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. तसेच शनिवार आणि रविवार मार्केट यार्ड बंद असल्यानेसोमवारी मार्केट यार्डमध्ये गर्दीची शक्यता लक्षात घेऊन बाजार समितीने विविध उपाययोजना केल्या होत्या.
शहरातील केवळ नियमित येणारे घाऊक भाजीपाला, फळे खरेदीदारांनी मार्केट यार्डात खरेदीसाठी यावे. किरकोळ खरेदीदारांनी त्यांच्या परिसरात भाजीपाला, फळे खरेदी करून मार्केट यार्डातील गर्दी टाळावी.
किरकोळ भाजीपाला खरेदीदारांना प्रवेश दिला जाणार नाही असे आवाहन बाजार समितीने केले होते. मात्र मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी झुंबड उडाली होती. यामुळे बाजार समिती प्रशासनाच्या उपाय योजना फेल गेल्याचे चित्र दिसत होते. फुल बाजारामध्ये तर तोबा गर्दी होती. ग्राहकांना पाय ठेवायला जागा नव्हती इतके खरेदीदार होते. यामुळे सोशल डिस्टंसचा फज्जा उडाला होता.