हडपसर – राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक २४ व २६ राष्ट्रवादी काँग्रेस तसेच माजी नगरसेवक फारूकभाई इनामदार यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील छोट्या व्यावसायिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले.
आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक फारूकभाई इनामदार, कलेश्वर घुले ,संजय शिंदे, शीतल शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष धर्मराज मेहेत्रे ,खान साहेब ,बाळासाहेब ससाणे, ख्वाजाभाई पठाण, सागरराजे भोसले आदिजन उपस्थित होते. आमदार चेतन तुपे पाटील म्हणाले की कोरोना काळात फारुकभाईनी केलेले काम असो अनुकरणीय आहे.तसेच प्रभागात आजवर केलेली विकास कामे,येथील नागरिकांना वेळोवेळी केलेली मदत त्याकरिताच फारुकभाई इनामदार हे जनतेच्या मनात स्थान निर्माण करून आहेत अश्या शब्दात आमदार तुपे यांनी इनामदार यांचा गौरव केला व उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते सुफियान इनामदार व मित्र परिवाराने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणयराजे भोसले यांनी केले. आभार रमजानभाई शेख यांनी मानले.
“समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि कोरोनाची सद्यस्थिती पाहता लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. प्रत्येकाने जर आपल्या शेजारच्या ला थोडीशी मदत केली तर माणुसकीची भावना जपली जाईल व यातूनच एक चांगला समाज निर्माण होण्याचे काम प्रत्येकाच्या हातून होईल.” फारुकभाई इनामदार (माजी नगरसेवक)