पुणे : गुंतवणूकीवर परतावा न देता दोन कोटींची फसवणूक

बांधकाम व्यवसायीक अटक

पुणे – गुंतवणूकीवर परताना न देता ठेवीसह 1 कोटी 91 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका बांधकाम व्यवसायीकाला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. जगदीश हिरालाल उणेचा(58, रा.भोसलेनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या पत्नी व मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी जयंत प्रल्हाद पंडित(66,रा.सिंहगड रस्ता) हे व्यवसायाने आर्किटेक्‍चर आहे. त्यांना उणेचा कुटूंबाने तुम्ही पैसे उणेचा असोसिएटसमध्ये ठेवल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले होते. त्यांनी 2015 मध्ये रक्कम गुंतवली होती, यानंतर त्यांनी काही वर्षानी रकमेचा परतावा मागितला होता. मात्र आरोपींना आणखी जास्त काळ रक्कम ठेवा आकर्षक परतावा मिळेल असे सांगत रक्कम परत दिली नाही.

दरम्यान ते ज्या बांधकाम स्किमच्या आधारावर परतावा देणार होते. त्या स्किममधील एकही सदनिका आजवर बांधली गेली नाही. मात्र पंडित यांना स्किमचे काम जोरात सुरु असल्याचे तसेच सदनिकांचे बुंकिंगही फटाफट होत असल्याचे खोटे सांगण्यात आले होते.

एक कोटी रुपये 2015 मध्ये गुंतवल्यानंतर त्यांना 2016 पासून परतावा देणे बंद करण्यात आले होते. मुदत ठेवीची एक कोटी व त्यावर जानेवारी 2016 पर्यंत 91 लाखाचा परतावा अशी 1 कोटी 91 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.