‘आरटीओ’तील एजंटने घातला 52 हजाराला गंडा

पुणे  – कर न भरल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एका तरुणाची कार जमा केली होती. ही कार सोडवून देण्यासाठी 52 हजार रुपये घेऊन एका एजंटने पळ काढला आहे. यामुळे आरटीओतील एजंटांची फसवेगिरी व त्यांचा तेथील वावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

याप्रकरणी एका 31 वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीने कारचा टॅक्‍स व व्यवसाय कर न भरल्याने आरटीओन त्याची कार जमा करुन घेतली होती. यासंदर्भात आरटीओ कार्यालयात आल्यावर त्याची एका एजंटशी ओळख झाली.

एजंटने फिर्यादीला कारचा टॅक्‍स, व्यवसाय कर आणी दंडासह 52 हजाराची रक्कम सांगितली. हे पैसे भरल्यानंतर तुम्हाला तुमची कार पुन्हा मिळेल असे आश्‍वासन दिले. यानंतर त्यांच्याकडून 52 हजार रुपये बॅंकेत वर्ग करुन घेतले. संबंधीत एजंटने फिर्यादीच्या कारची मुळ कागदपत्रे व विमाही घेतला आहे. फिर्यादीने त्याला आरटीओ कार्यालयात भेटण्याता प्रयत्न केला असता, तो भेटला नाही तसेच वारंवार फोन करुनही फिर्यादीचा फोन उचलत नाही.

फिर्यादीने त्याला डिसेंबर 2018 ते जानेवारी 2019 दरम्यन ही रक्‍कम व कागदपत्रे दिली होती. फिर्यादी यांनी व्यवसायीक परवाना घेऊन एका खासगी कंपनीला गाडी भाड्याने दिली होती. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक व्हि.डी.देशमुख करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.