पुणे – समृध्द जीवन फूडस इंडिया प्रा.लि व समृध्द जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कंपनी व संचालकांचे नावावर असलेल्या पाच गाडया राज्य गुन्हे अन्वेष्ण विभागाने (सीआयडी) जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. निसान मायक्रा, मिस्तुबिसी पजेरो, मिनी कूपर, मारुती स्विफ्ट डिझायर, टाटा इंडिका या जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा समावेश आहे.
समृध्द जीवन समूहा विरुध्द देशभरात सहा राज्यात एकूण 28 गुन्हे दाखल असून समृध्द जीवन समूहाच्या कंपन्यांनी लाखो गुंतवणुकदारांकडून सुमारे 5 हजार 211 कोटी 69 लाख रुपये इतक्या ठेवी जमा केल्या असून त्यापैकी 4 हजार 725 कोटी 64 लाख रुपयांहूनअधिक रकमेचा अपहार करण्यात आला आहे.
गुंतवणुकदारांच्या अज्ञानाचा फायदा घेवून कंपनीचे संचालक महेश मोतेवार व इतर आरोपींनी हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे. समृध्द जीवन या कंपनीच्या व आरोपीच्या नावावर काही चारचाकी वाहने असल्याची माहिती सीआयडीचे पथकास मिळाली होती त्यानुसार सदर वाहने जप्त केली आहे.