पुणे – मतदान केंद्रावर मिळणार “प्रथमोपचार औषध कीट’

ग्रामीण जिल्हा परिषद राबविणार उपक्रम

पुणे – लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक केंद्रावर “प्रथमोपचार औषध कीट’ देण्यात येणार आहे. जेणेकरून या कडक उन्हाळ्यात कोणाला त्रास झाल्यास तत्काळ प्राथमिक उपचार देणे शक्‍य होईल.

जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंन दिवस वाढत आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जवळ आला आहे. येत्या 23 आणि 29 रोजी पुणे जिल्ह्यात मतदान होणार आहे. त्यावेळी मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकाला किंवा केंद्रावर असलेल्या व्यक्तींना चक्कर येणे, उलट्या, जुलाब, थंडी, कणकणी, डोकेदुखी यासह अन्य त्रास झाल्यास त्यांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी जिल्हा परिषदेकडून कर्मचारी कक्षांतर्गत “प्रथमोपचार औषध किट’ देण्यात येणार आहे.

या कीटमध्ये ताप, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, अशक्तपणा, पित्त यासह जखम झाल्यास त्यावर औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच उष्माघाताचा धोका लक्षात घेता उष्माघात होण्यापूर्वीची लक्षणे, त्याबाबतचे प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार याबाबतची सविस्तर माहिती या किटवर छापील स्वरूपात देण्यात आली आहे. त्यामुळे याकिटचा नागरिकांना फायदा होणार असून, आपत्कालीन सेवेसाठी 108 आणि 102 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.