पुणे – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे १४ ठिकाणी आग लागल्याची घटना घडल्या आहेत. आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. मात्र, नागरिकांनी फटाके फोडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लक्ष्मीपूजननिमित्त ठिकाणी फटाके फोडण्यात आले. रात्री सात ते नऊ वाजेदरम्यान १४ ठिकाणी आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमक दलाच्या जवानांनी दिली आहे. कळस येथे रस्यावर कचरा पेटला होता. तर मांजरी, मोरे वस्ती येथे ऊसाच्या शेतामध्ये आग लागली होती.
बालेवाडी फाटा, काका हलवाई स्वीट समोर वायर पेटली. कोथरुड, रामबाग कॉलनी येथे झाडाला आग, मार्केटयार्ड, गेट क्रमांक पाचजवळ कचरयाच्या वाहनामधील कचरा पेटल्याने आग, सहकारनगर पोलिस चौकीजवळ नारळाच्या झाडाला आग, मंगलदास रस्ता येथे झाडाला आग, गणेश पेठ, बुरुड आळी येथे ताडपञी पेटल्याने आग, काञज, संतोषनगर येथे इमारतीच्या गॅलरीमध्ये आग, रविवार पेठ, तांबोळी मस्जिद नजीक कपड्याच्या दुकानात आग लागली होती.
बी टी कवडे रस्ता, भारत फोर्ज कंपनीसमोर ट्रकला आग, लक्ष्मी रोड, विजय टॉकीज जवळ आग, कळस स्मशानभूमी जवळ शेतामध्ये आग, टिळक रस्ता, महाराष्ट्र मंडळ शेजारी झाडाला आग लागली होती. आगीच्या घटनांमध्ये कोणीही जखमी व जिवितहानी झाली नाही.