पुणे – जमीनमोजणीसाठीचे ड्रोन दाखल

36 हजार गावठाणांची मोजणी करणार

पुणे – राज्यातील गावठाणांची मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडे चाळीस ड्रोन दाखल झाले आहेत. या मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरू होणार असून या ड्रोनच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत राज्यातील 36 हजार गावठाणांची मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर गावठाणातील रहिवाशांना आपल्या मालमत्तेची सनद मिळणार असून जागेसंदर्भातील वाद संपुष्टात येणार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि गतीने जमीन मोजणीचे काम करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला होता.त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी या गावी राबविण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यामुळे राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाला ड्रोनचा वापर करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. राज्यात जमीन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करण्यात आला. यामुळे सर्वसाधारणपणे पद्धतीने गावठाण मोजणी करण्यासाठी 15 ते 30 दिवस लागतात. मात्र, ड्रोनच्या सहायाने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भूमिअभिलेख विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता.

सध्यस्थितीत जमीन मोजणीसाठी ईटीएस मशीनचा वापर करण्यात येतो. यामुळेही जमीन मोजणी लवकर होण्यास मदत होते. मात्र, आता भूमिअभिलेख विभाग त्याहीपुढे जाऊन ड्रोनच्या सहाय्याने जमिनींची मोजणी करणार आहे. त्यामुळे एका दिवसात ड्रोनच्या सहायाने तीन गावठाणांची मोजणी करणे शक्‍य होणार आहे.

राज्यातील गावठाणांची मोजणी ड्रोनच्या माध्यमातून करण्यासाठी ग्रामविकास विकास विभागाच्या वतीने कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडे चाळीस ड्रोन आणले आहेत. मेपासून प्रत्यक्षात गावठाणाची मोजणीच्या कामास सुरूवात करण्यात येणार आहे.
– किशोर तवरेज, उपसंचालक, भूमी अभिलेख

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.