पुणे – हार्डिकर हॉस्पिटलमध्ये एका तरुणी रुग्णाला शस्त्रक्रीयेसाठी नेले असताना तीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी वॉर्ड बॉयला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.
शैलेश मधुकर कांबळे (30, रा. सिध्दार्थ झोपडपट्टी, पुणे रेल्वे स्थानकाजवळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
तीच्यावर हार्डीकर रुग्णालयात उपचार सुरु असून शुक्रवारी शस्त्रक्रीया करण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले होते. तेथे वॉर्ड बॉय असलेल्या आरोपीने तीचा विनयभंग केला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिक्षा झडते करत आहेत.