पुणे – आफ्रिका खंडाच्या विविध देशांतून आलेल्या २७ भारतीय नागरिकाची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा जीव भांड्यात पडला.
आफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ बोरिएंटचा संपूर्ण जगाने आता धसका घेतला असून, आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरही बन्याच देशांनी निर्बंध आणले आहेत. भारतातही आफ्रिकेतील विविध देशांतून प्रवासी आले आहेत. त्यातील हजारभर प्रवासी मुंबईत आले आहेत. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इच्छितस्थळी गेले आहेत. बरेच प्रवासी पुण्यातही आले आहेत.
झांबियाहून आलेल्या एका नागरिकाला करोनासदृश लक्षणे दिसत होती. त्याला उलटया आणि पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना चाव करण्यात आली. त्यावेळी ते पॉझिटिव्ह निघाले. त्यांच्यापांची चाचणी मात्र निगेटिव्ह आली.
मात्र, महापालिका प्रशासनाने शोधून काढलेल्या अन्य प्रवाशांमधील १४ जणांची आरटी-पोसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती, साथरोग विभागप्रमुख आणि सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव बावरे यांनी दिली. याशिवाय अन्य प्रवास करून आलेल्यांचे कॉन्टेक्ट ट्रेसिंग महापालिका करत आहे.
नागरिकांनीच काळजी घ्यावी
करोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे सर्व आवश्यक नमुने जिनोम सिकेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. ज्या व्यक् देशांमधून प्रवास करून आल्या आहेत, त्यांनी स्वतःच एक आठवडा गृहविलगीकरणात यहावे, जेणेकरून करोना आणि नव्या रिट पसरण्याचा धोका राहणार नाही, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.