पुणे – नामांकित कंपनीच्या नावाखाली बनावट कपड्यांची विक्री करणार्या दुकानदारांचा गुन्हे शाखेच्या युनीट दोनने पर्दापाश केला आहे. संबंधित दुकानातून ३५ लाख ३१ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई ४ डिसेंबरला कोरेगाव पार्क परिसरातील दुकानांमध्ये केली आहे. मोनिश लिलाराम अकतराय (वय २३ रा. ग्रीन व्हॅली वानवडी) आणि सोनू राम लोकनादन (वय २६ रा. कवडेनगर नवी सांगवी ) यांच्यासह महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नामांकित कंपनीचा बनावट मालाची विक्रीविरूद्ध कारवाईसाठी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या पथकाने शोध मोहिम सुरू केली. कोरेगाव पार्क भागातील नार्थ रोडवरील इनक्लॉथ स्टोअर्स, डिनोव्हो क्लॉथ स्टोअर्समध्ये ब्रॉडेड कंपनीचे रजिस्ट्रेशन असलेले बनावट लेबल व लोगोचा वापर करुन विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले.
युनीट दोनचे एपीआय अमोल रसाळ यांच्या पथकाने दि. ४ डिसेंबरला कारवाई केली. ही कारवाई अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे, उपनिरीक्षक नितिन कांबळे, शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे , गणेश थोरात, हनुमंत कांबळे, साधना ताम्हाणे, पुष्पेद्र चव्हाण, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखिल जाधव, नागनाथ राख यांनी केली.
नामांकित कंपनीच्या नावाखाली बनावट लोगो वापरून कपडे, विविध वस्तूंची विक्री कोरेगाव पार्कमधील दुकानांमध्ये होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित दुकानात छापा टाकून ३५ लाखांवर किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
– प्रताप मानकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनीट दोन